चार कोटी वृक्ष लागवडीसाठी प्रशासन सज्ज

0
जळगाव । दि.21 । प्रतिनिधी-शासनाने 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. या कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात 1 रोजी ते 7 रोजी पर्यंत सुमारे 4 कोटी वृक्ष लागवड करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून सज्ज झाले आहे.
तसेच यासाठी 50 हजार हरितसेना सदस्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक अधिकारी आदर्शकुमार रेड्डी, यावल विभागाचे वन विभागाचे उपवनसंरक्षक संजय दहिवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शासनातर्फे राबविण्यात आलेल्या वृक्ष लागवडीसाठी नागरी संस्था, सेवाभावी संस्था यांनी हरित सेना सदस्य म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.
हरितसेना सदस्य नोंदणी केलेल्या सदस्यांना रोप पुरवठा प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यामध्ये इयत्ता 5 वी वरील विद्यार्थ्यासह सर्व नागरीक नोंदणी करु शकतात.
तसेच दि. 25 रोजी नोंदणी झालेल्या नागरीकांना त्यांनी केलेल्या मागणीनुसार वृक्षलागवडीसाठी सशुल्क रोपे पुरविण्यात येणार आहे.
त्याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण 1 हजार 153 ग्रामपंचायतीत प्रत्येकी 375 रोपे प्रत्येक ग्रापंचायत मोफत पुरविण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 25 रोजी हरितसेना सदस्य नोंदणी संकेतस्थळ बंद करण्यात येणार आहे.

तसेच हरितसेना नोंदविलेल्या माहितीनुसार जिल्हाभरात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. तसेच यावर नोंदणी न झाल्यास माय प्लँट या मोबाईल अ‍ॅप्सवर नोंदणी करता येणार आहे.

जिल्हाभरात एकूण 1 हजार 130 ठिकाणी 21 लाख 17 हजार रोपांची लागवड करण्यासाठी वन विभाग सामाजिक वनीकरण जिल्हास्तर 45 व तालुका स्तरावर 290 समन्वयक नियुक्त करण्यात आलेे आहे.

तसेच शासनातर्फे रोप आपल्या दारी ही योजना राबविण्यात येणार असून तालुकास्तर रोप वितरण केंद्र उघडण्यात येणार आहे.

शासकीय निमशासकीय यंत्रणा सामाजिक संस्था महाविद्यालय, शाळा सेवाभावी संस्था अशा एकूण 33 यंत्रणांचा सहभागी होणार आहे.

तरी नागरीकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

LEAVE A REPLY

*