आजाराला कंटाळून वॉचमनची गळफास घेवून आत्महत्या

0
जळगाव । दि.15 । प्रतिनिधी – एमआयडी परिसरातील एका कंपनीतील वॉचमनने आजाराला कंटाळुन आत्महत्या केली. ही घटना सकाळी 10.50 वाजेच्या पुर्वी घडली.
याप्रकरणी एमआयडीसी कार्यालयात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील मंडाळा गावातील रहिवाशी असून ते प्रदिप शामराव कोळी(वय 50) हे गेल्या चार ते पाच वर्षापासून औद्यागिक वसाहत परिसरातील मानस अ‍ॅक्वा या कंपनीत वॉचमन म्हणून कामाला होते.

कंपनीच्या वॉचमन खोलीत ते पत्नी अनिता, तीन मुली आणि मुलासोबत राहत होते. पत्नी अनिता ह्या देखील औद्यागिक वसाहत परिसरातील एका कंपनीत काम करतात.

दरम्यान, प्रदीप कोळी हे गेल्या काही महिन्यांपासून आजाराला त्रासलेले होते. गुरूवारी सकाळी कुटूंबिय घराबाहेर बसलेले असतांनाच प्रदिप यांनी खोलीत सकाळी 10.50 वाजेच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला.

काही वेळात पत्नी घरात गेल्यानंतर त्यांना पती प्रदिप हे गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी आरडा-ओरडा केली. परिसरात असलेल्या कंपनीच्या कर्मचार्‍यांनी त्या ठिकाणी धाव घेत प्रदिप यांना खाली उतरविले.

त्यानंतर लागलीच जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ नेले. परंतू वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर प्रदिप यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी सीएमओ डॉ. निता भोळे यांच्या खबरीवरून औद्यागिक वसाहत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*