सिमी : दी फर्स्ट कनव्हिक्शन इन इंडिया पुस्तकाचे 6 रोजी प्रकाशन

0
जळगाव । दि.3 । प्रतिनिधी-जळगाव जिल्ह्यासह देशात दहशतवादी कारवायांसाठी कुप्रसिध्द असलेली स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दहशतवादी संघटनेचा इतिहास उलगडणार्‍या, सिमी: दी फर्स्ट कनव्हिक्शन इन इंडिया या पुस्तकाचे दि.6 रोजी सकाळी 10 वाजता लेवा भवन येथे प्रकाशन होणार असल्याची माहिती पुस्तकाचे लेखक पत्रकार विजय वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिमी: दी फर्स्ट कनव्हिक्शन इन इंडिया हे सिमी दहशतवादी संघटनेबाबत मराठी भाषेतील पहिलेच पुस्तक असून या पुस्तकाचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला माजी महसुलमंत्री आ. एकनाथराव खडसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, खा.ए.टी. पाटील, आ.राजुमामा भोळे, आ.चंद्रकांत सोनवणे, महापौर नितीन लढ्ढा, पत्रकार प्रमोद बर्‍हाटे, समीर दरेकर आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.

सिमी दहशतवादी कारवायांमध्ये तरुणांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग कसा वाढला. तसेच सिमीच्या प्रकरणातून निर्दोष सुटल्यानंतरदेखील काहींचे उध्दवस्त झालेले आयुष्य आणि गेलेली सामाजिक प्रतिष्ठा याचा निरपेक्षपणे तसेच चिकीत्सक वृत्तीने सत्यदर्शी व प्रामाणिक भूमिका मांडण्याचा प्रयत्न पत्रकार विजय वाघमारे यांनी सिमी: दी फर्स्ट कनव्हिक्शन इन इंडिया या पुस्तकातून केला आहे.

या पुस्तकात विविध 12 प्रकरणे पुराव्यासह मांडण्यात आली असून जळगाव, नागपूर, मुंबई येथील गुन्हयाच्या खटल्याची माहिती देण्यात आली असून जळगाव पोलिसांमुळेच सिमी संघटनेवर बंदी कशी आली याचे लिखाण या पुस्तकातून मांडले आहे.

सिमीच्या गुन्हाचा पोलिस तपास, न्यायालयातील पुरावे, तपासधिकारी, सरकारी वकील, आरोपींचे वकील आणि पत्रकार यांच्या देखील मुलाखती पुस्तकात असल्याचे पुस्तकाचे लेखक पत्रकार विजय वाघमारे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*