शिरसोली नाक्याजवळ अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन पकडले

0
जळगाव । दि.22 । प्रतिनिधी-तालुक्यातील शिरसोली नाक्याजवळ अवैध मद्याची वाहतुक करतांना एकाला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगावकडुन वावडदाकडे अवैधरित्या मद्य वाहतुक करीत असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोनि. सुनिल कुर्‍हाडे यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडागळे,पोना.विजय दामोदर पाटील, भास्कर ठाकरे, पोना.निलेश भावसार, पोकॉ. अविनाश देवरे, पोकॉ.निलेश पाटील यांचे पथक तयार करण्यात आले.

या पथकाने वावडदाकडे जात असतांनाच शिरसोली नाक्याजवळ ट्रक्स गाडी क्रमांक एम.एच.14 एक्स 1977 ला थांबविली.

त्यामध्ये सुमारे 2 लाख 37 हजार 500 रुपयांची किंमतीचे मद्य मिळुन आले. याप्रकरणी चालक सुपडू गोपाळ याला अटक करण्यात आला आहे. त्याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीसा ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*