भाद्रपद कृष्ण त्रयोदशीपासून भाद्रपद शुक्ल पंचमी पावेतो आठ दिवसांत आत्मिक साधना भक्तीमध्ये पर्युषण पर्वाचे सुस्वागतम् व आराधना होते. पर्युषण पर्व आठ दिवसांची आत्म जागृतीची साधना आहे.
पर्युषण पर्व आत्मिक सण आहे. आपल्यातील क्रोध, मान, माया, लोभ या संसारातील विकारांच्या वृत्तींचा त्याग करून आत्मरुपात स्थिर होणे पर्युषण सणाचा साधा सरळ अर्थ आहे.
खरे सुख बाह्य पदार्थात आणि इंद्रिय विषय भोगात नाही. जसा जसा मनुष्य इंद्रिय दमन करून इच्छारहित होतो तसा तसा तो सुखी होत जातो.
भाद्रपद कृष्ण त्रयोदशीपासून भाद्रपद शुक्ल पंचमी पावेतो आठ दिवसात आत्मिक साधना भक्तीमध्ये पर्युषण पर्वाचे सुस्वागतम् व आराधना होते. पर्युषण पर्व आठ दिवसांची आत्म जागृतीची साधना आहे.

क्रोधाला क्षमापनेने, अहंकाराला विनयाने, कपटी माया वृत्तीला सहज सरळ भावनेने, लोभाला समाधानाने, अंगीकृत झालेवर मानव सुखी होतो. मन, वचन, काया यांच्या प्रवत्ती विषयमभोग आणि राग द्वेषापासून दूर जाऊन आत्मोन्मुखी बनतात. ज्ञान, दर्शन, चारित्र्य आणि तपाने आत्मा बलवान बनतो.

माणसाच्या आंतरिक भावना विशुद्ध होतात. संसारातील प्राणी मात्रांवर मैत्री व बंधुत्वाची भावना जागृत होते. इतरांच्या गुणांच्या दर्शनाने स्वत: प्रमोदीत होतो.

दु:खीजनांना पाहून तो करुणामयी होतो. शरीरावरची आसक्ती जो जो दूर होत जाते तो तो राग द्वेषाची वृत्ती कमी कमी होत जाते. यामुळे आत्मुणांची आराधना, आत्म दोषांकडे पाहाण्याची दृष्टी, स्वत:च्या दोषांचे प्रायश्चित करत करत अहिंसा, संयम आणि तपाच्या आराधनेने बलवान होतो.

जे आपल्यात दोष आहे. त्यांचा त्याग करतो. भविष्यात होणार नाही याची काळजी घेतो. यासाठी सामायिक प्रतिक्रमण-आलोचना-क्षमायाचनाद्वारे सर्व प्राणीमात्रांशी प्रेम करावयास लावतो.

पर्युषण पर्व सर्व सणांचा राजा आहे. हा रक्षाबंधनाचा आत्मिक सण आहे. कारण सर्व सृष्टीची रक्षा व्हावी, सर्वांचे कल्याण व्हावे हा संदेश हा सण देतो. पर्युषण दसरा आणि विजया दशमीचा सण होऊ शकतो.

इंद्रिय आणि मनाच्या विषयम विकारासंबंधी रावण रुप प्रवृत्तींचा विनाश करून आत्माराम विजयी होतो व वैरभाव नष्ट होतो. पर्युषण पर्व दीपावलीचा सण मानण्यास दुजोरा मिळतो.

पर्युषण पर्वात पणत्यांच्या ज्योती प्रज्वलित करीत नाहीत तर आत्म्याचे दीपक प्रज्वलित होत असतात. आंतरिक जीवनाची अहंकाल लोभ राग द्वेष मान मरातब क्रोध माया इत्यादीची सफाई होते.

व्यापारातील लक्ष्मीचा जमाखर्च होत नाी. तर शुभ-अशुभ कर्माचा आय-व्ययचा हिशेब केला जातो. सतकर्म, सद्भावना वृद्धी होते. हीच खरी लक्ष्मी प्राप्ती होते.

लेखक – मोहनलाल कुमठ

पर्युषण पर्व होळीचा सण आहे. होळीच्या अग्नीज्वालेत मनाचे विकार भस्मसात करण्याचा सण आहे. तसेच पर्युषणपर्व रंगपंचमीचा देखील सण आहे. सर्व प्राणी मात्रासह प्रेमरंग खेळण्याचा हा सण आहे.

संवत्सरी पर्युषण पर्वाचा शेवटचा दिवस होय. संवत्सरीस महान सण संबोधतात. जैन दर्शन आत्म्याच्या मुक्तीचा श्रेष्ठ व सूक्ष्म दर्शन आहे. रागद्वेषाचा नाश झालेवर आत्म्याची मुक्ती होते.

राग, द्वेष रहित अवस्था हाच खरा जैन धर्म आहे. सवार्ंंप्रती प्रेम असून कोणाच्याही प्रति द्वेष नाही. हाच आत्मकल्याणाचा खरा मार्ग आहे. क्षमापन जैनाचे दिव्य तत्व आहे. विश्वशांतीचा तो एक अमोल मंत्र आहे.

क्षमा ही एक अद्भूत अमोघ औषधी आहे. संसारात चुका संभवतात. मात्र या चुकातून निर्माण झालेले वैर, इर्षा, कटूता, शत्रुता विसरली जात नाही. चूक होणे फार मोठा अपराध नाही.

चूक कबूल न करणे मात्र मोठा अपराध आहे. समजता अगर न समजता झालेल्या चुकीचा स्वीकार आणि केेल्या अपराधाची कबुली आणि त्यासाठी घेतलेले प्रायश्चित हे खर्‍या अंत:करणाच्या हृदयाची सत्याची क्षमा मागणे आणि ती उदार अंत:करणाने देणे हे दोन्ही खरीखुरी क्षमा आहे.

क्षमा धर्म पर्युषण पर्वाचे आराधनेचे उंच शिखर आहे. राग, द्वेष, नष्ट झाले नाहीतर जीवनातील सर्व आराधना मृतवत शून्य आहे.

खामेमि सव्वे जीवा
सव्वेजीवा खमंतु मे
मित्तीमे सव्व भुएसू
वेरं मज्झं न केणई

सर्व प्राणी मात्राची मी क्षमा मागतो. सर्व प्राणी मात्र मला क्षमा करा. सर्व प्राणी मात्रांवर माझी मैत्री आहे. कोणत्याही प्राणीमात्रांशी माझे वैर नाही. अंत:करणपूर्वक केलेली क्षमा पापाला पळून लावते. चुकांची आठवण ठेवीत नाही.

वैरभावाचे प्रेमात रुपांतर करते. चित्तवृत्ती शुद्ध निर्मल बनवते. हृदयाला प्रसन्न करते. क्षमाची ज्योत-हृदयात प्रज्वलित होऊन आत्म्याला प्रकाशित करते.

हीच पर्युषण पर्व व संवत्सरीनिमित्त ईश्वरा ईश्वराजवळ विनम्र प्रार्थना, क्रोधात प्रेमाने, लोभांत दानाने, भोगास संयमाने, जिंकले तर मानव अंतर्मुख होऊन सुखाचा मंत्र प्राप्त करू शकतो हीच क्षमापना होय.

संवत्सरीचा दिवस अंतर्मुख साधनेने आत्मशुद्धी करण्याचा. झालेल्या चुकांबद्दल पश्चाताप करण्याचा, प्रेमभावना प्रस्थापित करणेचा, माफी करण्याचा, क्षमा मागणेचा महान पर्व होय. यामुळे मानवात मन:शांती, प्रसन्नतेची आंतरिक समाधानाची सिद्धी प्राप्त होते.

सर्वांच्या सुखात सुख सामावलेले आहे याची ज्ञान प्राप्ती होते. हृदय शुद्ध होऊन जीवनाबद्दलची सार्थकतेची प्रचिती प्राप्त होते. हृदय शुद्ध होऊन जीवनाबद्दलची सार्थकतेची प्रचिती प्राप्त होते.

गंगेत आंघोळ केल्याने पाप जसे मिटत नाही तसे संवत्सरी पर्वाच्या दिवशी मला क्षमा करा. मी क्षमा करतो म्हटल्याने पापमुक्ती होत नाही. त्याला अंत:करणाने क्षमावान झाले पाहिजे.

क्षमा कोणाची मागावयाची हे सुद्धा महत्त्वाचे आहे.
1) नोकरांना कमी पगार दिला, जास्त काम घेतले यांची क्षमा मागा.
2) मजुरांकडून जास्त मजुरी करून घेतली व कमी मोबदला दिला यांची क्षमा मागा.
3) शेतकर्‍यांची, पशुपालक, विणकर यांची क्षमा मागा ते उघडे, उपाशी आहे हे कधी पाहिले का?
4) आजारी, दु:खी, गरीब, विद्यार्थी मदत मागावयास आले असता सहाय्यभूत झाले का कसे? पैशाचा उपयोग विलासासाठी केला. आपल्या मुलाबाळांच्या लग्नात लाखो खर्च केले. परंतु असहाय्य विधवांना मदत केली नाही अशांची क्षमा मागा.
5) ग्राहकांना भेसळयुक्त माल दिला, वजन कमी दिले भरपूर नफा घेतला यांची क्षमता मागा.
वरील नमूद केलेल्या चुका होणार नाहीत तरच खरी खुरी पर्युषण आराधना व संवत्सरी पर्व साजरे झालेच तर जीवनाचे सार्थक होईल. मोक्षाचे साधन सुख मिळेल.

 

 

LEAVE A REPLY

*