मद्यधुंद एजंटची परिवहन अधिकार्‍यांना शिविगाळ

0
जळगाव । दि.16 । प्रतिनिधी – उपप्रादेशिक परिवहन विभागातील परिवहन अधिकार्‍याशी मद्यधुंद एजंटनी हुज्जत घालुन शिवीगाळ केल्याची घटना आज दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान परिवहन अधिकारी यांनी एजंटसह दलालांना कार्यालयाबाहेर काढून प्रवेशद्वार बंद करून त्यांना बाहेर काढल्याने काही वेळ परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.
आरटीओ कार्यालयात दलालाचा वावर पुन्हा वाढला आहे. दलाल ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी देखील अधिक पैसे घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे.
दरम्यान आज दुपारी एका गणेश नामक एजंटने मद्यधुंद अवस्थेत परिवहन अधिकारी यांच्या दालनात येवून त्यांची हुज्जत घातली.
यावेळी परिवहन अधिकारी पाटील यांनी त्या एजंटला बाहेर जाण्यास सांगितले असता, त्यांने पाटील यांना शिवीगाळ केली.

दरम्यान परिवहन अधिकारी यांनी एजंटसह सर्व दलालांना कार्यालयबाहेर काढून मुख्य प्रवेशद्वार बंद केले. या प्रकारामुळे परिसरात काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता.

दरम्यान याबाबत पाटील यांनी दलाल ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अधिक पैसे घेतात तसेच परिवहन कार्यालयात दलालांचा वावर वाढत असल्याने वाहन चालविण्याची चाचणी घेण्यासाठी अडचणी येत असल्याने सर्व अधिकृत एजंट व दलाला कार्याबाहेर जाण्यास सांगितले आहे.

शोरूम कर्मचारी व ड्राईव्हिग स्कुल कर्मचार्‍यांना प्रवेश
आरटीओ कार्यालयात दलालांचे नेहमीच किरकोळ वाद होत असतात, तसेच एजंट नसलेले देखील काही नागरिक कार्यालयात येवून एजंट असल्याचे सांगतात.

त्यामुळे बोगस एजंट, दलांलाचा कार्यालयात वापर वाढला असल्याने परिवहन कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान शोरूम कर्मचारी व ड्राईव्हिंग स्कुल कर्मचार्‍यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी दलालांकडून जास्तीचे पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आहे. त्यामुळे नागरिकांनी ड्राईव्हिंग स्कुल व महाऑनलाईन वरून फार्म भरावे तसेच दलालांपासून सावध राहावे असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*