राज्य नाट्य स्पर्धेची घंटा वाजली;सहा नोव्हेंबरपासून प्राथमिक फेरीला प्रारंभ

0
जळगाव,दि.1 प्रतिनिधी-राज्य हौसी नाट्यस्पर्धेची घंटा वाजली असून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने .त्या बद्दलची घोषणा नुकतीच आलीं आहे.

6 नोव्हेंबर 2017 पासून सुरु होणार्‍या 57 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यातील विविध केंद्रावर आयोजित केली जाणार आहे .तसेच बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 4 डिसेंबर 2017 पासून तर हिंदी,संस्कृत,संगीत भाषेतील नाट्य स्पर्धा जानेवारी 2018 मध्ये आयोजित केल्या जाणार आहेत.सदर प्रवेश अर्ज www.maharashtra.gov.in वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहेत.

जळगाव केंद्रावर उत्सुत्कता
या वर्षी पासून शासनाने बक्षीसांच्या रकमेत दुप्पटीने वाढ केली आहे ,गेल्या वर्षी जळगाव केंद्रावर एकूण 18 नाटकांचे सादरीकरण झाले होते,या मधून भुसावळच्या उत्कर्ष संस्थेचे राहुल बनसोडे लिखित व अनिल कोष्टी दिग्दर्शित दक्षिण आधुनिक या नाटकाची अंतिम फेरी साठी निवड करण्यात आली होती.महाराष्ट्रातील इतर केंद्रावर सादर होणार्‍या नाटकांची संख्या पाहता जळगाव केंद्रावर सादर होणार्‍या नाटकांची संख्या लक्षणीय होती,जळगावातील तरुण वर्गाचा उत्साह पाहता या वर्षी सुद्धा नाटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.पण या वर्षी सुद्धा बंदिस्त नाट्यगृहाचे बांधकाम अजूनही पूर्ण झाले नसल्याने स्पर्धेत सहभाग नोंदवणार्‍या रंगकर्मीचे बंदिस्त नाट्यगृहात नाटक सादर करण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे .

महाबळ रोडवरील मायादेवी नगर येथे 8 ते 9 वर्षांपासून सुरु असलेले नाट्यगृहाचे बांधकाम स्पर्धा सुरु होई पर्यंत म्हणजेच नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईल असे वाटत नाही ,त्यामुळे यावर्षीसुद्धा स्पर्धा बालगंधर्व खुले नाट्यगृह किंवा इतर कुठल्या सभागृहात स्पर्धा पार पडेल .

विनोद ढगे (समन्व्यक,राज्य नाट्य स्पर्धा जळगाव केंद्र )

 

 

LEAVE A REPLY

*