पोलीस पिता-पुत्रांच्या अटकपूर्व जामीनावर सरकार पक्षाची हरकत

0
जळगाव । दि.29 । प्रतिनिधी-आभियांत्रिकीच्या तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस कर्मचार्‍यासह फौजदाराविरुध्द जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे.
या पोलिस पिता – पुत्रांच्या अटकपूर्व जामिनावर आज न्यायालयात कामकाज होवून सरकार पक्षाने अटकपूर्व जामीनावर हरकत घेतली. दरम्यान अटकपूर्व जामिनीवर उद्या दि.30 रोजी कामकाज होणार आहे.
पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिस कर्मचारी परवेझ शेख व त्याचे वडील पीएसआय रईस शेख व समी तडवी या तिघांविरुध्द जिल्हा पेठ पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

दरम्यान पोलिस पिता-पुत्रांनी दि.29 पर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामिन मिळविला होता. दरम्यान त्याच्या अटकपूर्व जामीनावर आज न्या. अग्रवाल यांच्या न्यायालयात कामकाज होते.

त्यामुळे पोलिस पिता-पुत्रांनी आज न्यायालयात हजर होते. सरकारपक्षाने पिडीत तरुणीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत पोलिसांनी काही मनाने मुद्दे टाकले आहे.

तसेच यातील एक संशयित हे पोलिस असल्याने पदाचा गैरवापर करून हे शक्य झाले आहे. तसेच संशयित हे पालिस असल्याने फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव आणु शकतात, गुन्हातील तिसरा संशयित अद्याप फरार असून तपास अद्याप बाकी असल्याने संशयितांचा अटकपूर्व फेटाळण्यात यावा असा युक्तीवाद सरकारपक्षांकडून अ‍ॅड. भोंबे यांनी केला आहे.

संशयितांतर्फे अ‍ॅड. सागर चित्रे यांनी संशयित परवेझ शेख व पिडीत तरुणी लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिप मध्ये राहत होते. संशयित हे पब्लिक सर्व्हंट असल्याने दबाव आणतील या नजरेने त्यांच्याकडे पाहिले जात असल्याचा युक्तीवाद केला.

दरम्यान पिडीत तरुणीच्यावतीने अ‍ॅड. निरंजन चौधरी यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून संशयितांच्या अटकपूर्व जामीनावर तीव्र हरकत घेतली. दरम्यान या अटकपूर्व जामीनावर उद्या दि.30 रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

LEAVE A REPLY

*