राजकीय दबाव इच्छाशक्तीच्या बळावर झुगारता येतो – डॉ.एन.रामास्वामी

0
जळगाव । दि.24 । प्रतिनिधी-प्रत्येक व्यक्ती स्वतः एक प्रेरणास्रोत असते.आत्मजागृत व्हा. सामान्य व्यक्तीला सरकारी कार्यालयात यावेसे वाटले पाहिजे.
आपण सरकारी काम करताना समाधानी आहोत का हा प्रश्न प्रत्येक अधिकार्‍याने विचारला पाहिजे. प्रशासनात राजकीय दबाव असतो तो आपण आपल्या इच्छाशक्ती ,सत्य आणि सद्सद्विवेक बुद्धी च्या बळावर झुगारु शकतो. असे मत नवी मुंबईचे आयुक्त डॉ. एन.रामास्वामी म्हणाले.

दीपस्तंभ फाउंडेशन आयोजित स्पर्धा परीक्षा यशवंतांच्या सत्काराच्या यशोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, आर.सी.बाफना ज्वेलर्सचे रतनलाल सी. बाफना, लेखक डॉ.किरण देसले उपस्थित होते.

पुढे बोलतांना डॉ.रामास्वामी म्हणाले की, अधिकारी हा घटनेच्या बाहेर न जाणारा, समतोल असला पाहिजे. जनसंपर्क हे प्रशासनाचे बाळकडू आहे.

सरकारी नोकरीत पगार घेऊन समाजसेवेची संधी मिळते. तंत्रज्ञान हि आधुनीक जगाची गरज आहे, प्रशासनाने तंत्रज्ञान आधारित यंत्रणा उभारली तर अनेक प्रश्न सुटतील.

असे डॉ.रामास्वामी म्हणाले. आपल्या कर्तव्यपूर्ती सत्काराला उत्तर देताना डॉ. रामास्वामींनी सांगितले की, सामान्य अधिकारी उर्वरित अधिक प्रेरणेने काम करणार आहे.

अधिकार्‍याने जर आपल्या संवेदना जागरूत ठेवून काम केले तर समाज बदलेल. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आपण समाजाचं काही देणं लागतो, या भावनेने जर अधिकार्‍यांनी काम केले तर समाज सुखी होईल.

जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून काम करा.देशाला प्रामाणिक अधिकार्‍यांची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी सांगितले. लोकांचे दुःख दूर करणे देवाचे कार्य आहे.

 

 

 

 

LEAVE A REPLY

*