शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या बांधकामाला ग्रीन सिग्नल

0
जळगाव । दि.16 । प्रतिनिधी-शिवाजीनगर उड्डाण पुलाची जिर्ण अवस्था झाल्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे पुलाचे बांधकाम करण्यासाठी मनपा प्रशासनाने पाठपुरावा केला. दरम्यान, बांधकाम करण्यास ग्रीन सिग्लन मिळाला असून लवकरच काम सुरु करण्यात येणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर रेल्वे महाप्रबंधक आर.के.यादव आणि महापौर नितीन लढ्ढा यांनी पाहणी केली.
शिवाजीनगर उड्डाण पुलाचे बांधकाम होवून 102 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुलाची जिर्ण अवस्था झाली आहे.
परिणामी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नवीन पुल बांधण्यासाठी मनपा प्रशासनाने रेल्वे विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.

परंतु रेल्वे विभागाने महापालिकेला निधीची मागणी केली होती. मात्र मनपाची आर्थिकस्थिती बिकट असल्याने खर्च करणे, शक्य नसल्याचे कळविले होते. त्यानंतर प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.

या अनुषंगाने मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांची बैठक झाल्यानंतर पुलाचे बांधकाम करण्यासाठी राज्यशासन 50 टक्के आणि केंद्रशासन 50 टक्के खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून लवकरच पुलाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी रेल्वेचे महाप्रबंधक आर.के.यादव यांनी मनपा प्रशासनाने नाहरकत प्रमाणपत्र देण्याची शिफारस केली.

त्यानुसार मनपाकडून नाहरकत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शिवाजीनगर उड्डाणपुलाचे 8 कोटीचे काम रेल्वे विभाग तर उर्वरित काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

*