महासर्वेक्षणाचा अहवाल आयुक्तांना सादर

0
जळगाव । दि.21 । प्रतिनिधी-शहरातील अस्वच्छेबाबत जळगाव फर्स्टतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज आयुक्त जीवन सोनवणे यांना डॉ.राधेश्याम चौधरी यांनी सादर केला आहे.
दरम्यान दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी परिसरात स्वच्छतादूतांची नेमणूक करण्यात येणार असून त्याचे परिक्षण करण्यात येणार आहे.
शहरातील दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी मनपाकडून 22 प्रभागांमध्ये मक्ते देण्यात आले आहे. परंतू मक्तेदाराकडून स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा होत असल्याने त्यांच्याकडून स्वच्छता केली जात नाही.

त्यामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान सर्वेक्षणात झोपडपट्टीच्या भागांसह इतर भागात देखील पुरेशी स्वच्छता होत नसल्याचे चित्र यावेळी स्पष्ट झाले.

तसेच लोकसंख्या, भौगोलिक मानाने लोखंडी कचराकुंड्यांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी आहे. ज्याठिकाणी कचराकुंड्या आहेत त्या नियमित रिकाम्या करून स्वच्छ होत नाहीत. तसेच मनपाकडे कागदावर जेवढी यंत्रणा, मनुष्यबळ आहे तेवढे प्रत्यक्षात दिसत नाही.

साफसफाईसाठी तेवढे वाहने, ट्रॅक्टर, घंटागाडी आढळून आल्या नाहीत. नियमित घंटागाड्या त्या भागांमध्ये जात नसल्याचे डॉ. चौधरी यांनी आयुक्त सोनवणे सांगितले. यावर आयुक्तांनी मनपाकडून शहरातील स्वच्छता व्यवस्थित स्वच्छता होत नसल्याची कबुली दिली.

स्वच्छता दूतांची होणार नेमणूक
जळगाव फर्स्टतर्फे शहरातील काही वॉर्डामध्ये स्वच्छतेच्या यंत्रणेवर देखरेख ठेवण्यासाठी स्वच्छता दूत किंवा स्वयंसेवक नेमले जाणार आहे.

तसेच देखरेख करण्यासाठी यंत्रणा आमचीच राहणार असून केवळ स्वच्छता दूत नेमावे, असा प्रस्ताव जळगाव फर्स्टतर्फे आयुक्तांना दिला आहे.

यासंदर्भात शहरातील दहा वॉर्डामध्ये स्वच्छता दूत व स्वयंसेवकांची यादी अठवड्याभरात दिली जाणार आहे.

यावेळी विशाल वाघ, अनिल साळुंखे, अकीब खान, राजेंद्र महाजन, अशफाक पिंजारी, योगेश पाटील, राकेश पाटील, शोएब शेख, मतीन पटेल, मनोज चौधरी आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*