Thursday, April 25, 2024
Homeजळगावमनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे डीपी रोडचे आरक्षण रद्द ?

मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे डीपी रोडचे आरक्षण रद्द ?

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जुना भुसावळ रोड व खेडी यांना जोडणार्‍या प्रस्तावित विकास योजना 18 मीटर रस्त्याचे भूसंपादन करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठाने मनपा प्रशासनाला मुदत दिली होती.

- Advertisement -

मात्र प्रशासनाने कार्यवाही न केल्यामुळे भूसंपादनाचा प्रस्ताव रखडला आहे. परिणामी डीपी रोडचे आरक्षण रद्द झाल्याने या भागातील नागरिकांची आता, गैरसोय होणार आहे.

जळगाव शहर विकास योजना, जुनी हद्द व नवीन हद्द या दोन्ही विकास योजनांच्या नकाशामध्ये का.ऊ. कोल्हे विद्यालयाच्या लगत जुना भुसावळ रस्ता व खेडी रस्ता यांना जोडणारा 18 मीटर रुंदीचा विकास रस्ता दर्शविला आहे.

रस्ता विकासीत झाल्यास परिसरातील नागरिकांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल यासाठी माजी नगरसेविका ममता कोल्हे यांनी मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

तसेच रस्त्याचा विकास करुन देण्यासाठी जादाचा टीडीआर मिळावा यासाठी शेतजमीन मालकदेखील सकारात्मक होते. त्यानुसार प्रशासनासोबत चर्चा देखील झाली होती.

मात्र प्रशासनाने कुठलीही कार्यवाही न केल्याने शेतजमीन मालकांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. यावर न्यायालयाने वर्षभरात भूसंपादनाची कार्यवाही करावी. असे आदेश दिले होते.

मात्र मनपा प्रशासनाने वर्षभरात कुठलीही भूसंपादनाची कार्यवाही न केल्याने 18 मीटर डीपी रोडचे आरक्षण रद्द झाले आहे. परिणामी दशरथ नगर, तळेले कॉलनी, शंकरराव नगर, जुना असोदा रोड या भागातील नागरिकांची गैरसोय होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या