1700 गाळेधारकांना बजावणार नोटीस

0
जळगाव । दि.17 । प्रतिनिधी-मनपा मालकीच्या 27 व्यापारी संकुलांपैकी 18 व्यापारी संकुलातील 1275 गाळ्यांची मुदत सन 2012 मध्ये संपुष्टात आली आहे.
गाळे ताब्यात घेण्याबाबत प्रशासनाने 81 ब ची सुरु केलेली कार्यवाही थांबविण्यात आली होती. मात्र पुन्हा मागील महासभेत ठराव केल्यामुळे 2175 गाळेधारकांपैकी उर्वरित 1700 गाळेधारकांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
मनपा मालकीच्या 27 व्यापारी संकुलांपैकी 18 व्यापारी संकुलातील 2175 गाळ्यांची मुदत 31 मार्च 2012 रोजी संपुष्टात आली.
गाळे कराराने देण्याबाबत मनपाने 135 क्रमांकाचा ठराव केला. परंतु या ठरावाबाबत काही गाळेधारकांनी मुख्यमंत्र्यांकडे हरकत घेतल्यामुळे हा ठराव शासनाकडे प्रलंबित आहे.

त्यानंतर गाळेधारकांकडून भाडे वसुल करण्यासाठी 40 क्रमांकाच्या ठरावाबाबत नगरविकास राज्यमंत्र्यांकडे सुनावणी झाल्यानंतरही निर्णय प्रलंबित आहे.

गाळ्यांची मुदत संपल्यानंतर गाळे ताब्यात घेण्यासाठी तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी 81 ब ची कार्यवाही सुरु केली होती.

काही गाळेधारकांना नोटीस बजावून सुनावणी देखील घेण्यात आली होती. परंतु त्यानंतर सुनावणी घेण्याची कार्यवाही थांबवण्यात आली होती.

दि.29 मे 2017 रोजी 81 ब ची कार्यवाही करण्याबाबत महासभेत 642 क्रमांकाचा ठराव करण्यात आला आहे. या ठरावानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.

नोटीसची प्रक्रिया सुरु
महासभेत झालेल्या ठरावानुसार उर्वरित 1700 गाळेधारकांना नोटीस बजाण्यासाठी प्रशासनाने प्रक्रिया सुरु केली आहे. नोटीस बजावल्यानंतर संबंधित गाळेधारकांची सुनावणी घेण्यात येणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

*