मुक्ताईनगर तालुक्यातील 216 गावात सौरऊर्जा पंप कार्यान्वित होणार

0
जळगाव । दि.1 । प्रतिनिधी-मुक्ताईनगर तालुक्यात 216 गावांमध्ये पिण्याच्या पाणी योजना असून त्यावर सौरऊर्जा पंप कार्यान्वीत करण्यास विज मंडळाने मंजूरी दिली आहे.
राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असून येत्या दि.2 सप्टेंबरला शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती आ.एकनाथराव खडसे यांनी दै.देशदूतशी बोलतांना दिली.

लहान-लहान गावांमध्ये पाणी योजनेचे बिल थकीत असून ग्रामपंचायत बिल भरत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे पिण्याच्या पाणी योजनेवर सौरऊर्जा पंप कार्यान्वीत करण्याचा निर्णय विज मंडळाने घेतला आहे.

राज्यात सहा विभागात हा प्रकल्प राबविण्यात येणार असून नाशिक विभागात मुक्ताईनगर तालुक्यातील 216 गावांचा यात समावेश आहे. त्यामुळे आता मुक्ताईनगर तालुक्यातील 216 गावातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

महाऊर्जातर्फे पाच वर्ष देखभाल दुरुस्ती
मुक्ताईनगर तालुक्यातील 216 गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सौरऊर्जा पंप कार्यान्वीत करण्यात येणार आहे. हा सर्व खर्च विज मंडळातर्फे करण्यात येणार असून तब्बल 5 वर्षापर्यंत महाऊर्जातर्फे देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतींना विजबील देखील भरावा लागणार नाही.

बोदवड, भुसावळच्या 80 गावांना लाभ
बोदवड-भुसावळ तालुक्यात सामूहिक पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेंतर्गत 80 गावांचा समावेश आहे. दोन ऐकर जागेत सौरऊर्जेचे पॅनल कार्यान्वीत करण्यासाठी शासनाने मंजूरी दिली आहे. तसेच मुक्ताईनगर तालुका पाठोपाठ सावदा तालुक्यातही सौरऊर्जेची योजना कार्यान्वीत करण्यात येणार आहे.

कर्की येथे 132 केव्हीच्या विज वाहीनीला मंजूरी
अंतुर्लीजवळील कर्की गावात विजेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे 132 केव्हीची वीज वाहीनी उभारण्यासाठी शासनाने मंजूरी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

*