शेतकरी संघर्ष मोर्चाने धरणगाव दणाणले

0
धरणगाव  / माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील हजारो शेतकरी आज एकवटले. राष्ट्रवादीच्या शेतकरी संघर्ष मोर्चाने धरणगाव शहर दणाणले होते.
रणरणत्या उन्हाची पर्वा न करता शेतकर्‍यांनी सहभागी होवून हा मोर्चा यशस्वी केला. मोर्चाला मिळालेला प्रतिसाद पाहून भारावलेल्या गुलाबराव देवकर हाच मुहूर्त मानून विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुं कले.
आगामी काळात शेतकर्‍यांना कर्जमाफी न मिळाल्यास आंदोलन आणखी तिव्र करण्याचा इशाराही याप्रसंगी गुलाबराव देवकर यांनी दिला.

राष्ट्रवादी कॉग्रेसने शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष मोर्चा सकाळी 11 श्री बालाजी मंदिर येथून प्रारंभ झाला. धरणी चौक, कोट बाजार, शिवाजी महाराज पुतळा येथून उड्डाणपुलावरून तहसिल कचेरीवर नेण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्या हजारो शेतकर्‍यांनी विविध घोषणा देत शहर दणाणून सोडले. भाजप-शिवसेना सरकार विरोधातील घोषणांचा यात समावेश होता.

तहसील कार्यालयात मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. याप्रसंगी गफ्फार मलिक, रमेश माणिक पाटील, विलास पाटील यांनी आपल्या भाषणातून भाजपा-सेना सरकार व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टिकास्त्र सोडले.

राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे सत्तेत नसताना शेतकर्‍यांसाठी शिंगाडा मोर्चा काढत होते. आता सत्तेत आल्यावर, मंत्रीपद मिळल्यावर गप्प का झाले? असा सवाल रमेश माणिक पाटील यांनी उपस्थित केला.

मतदारसंघातील अवैध धंदे 15 दिवसात बंद न झाल्यास ना.गुलाबराव पाटील यांना मतदारसंघात फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

पाच-सहा वर्षानंतर कमबँक करणारे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी राज्यसरकार व गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकार शेतकर्‍यांच्या विरोधातील सरकार असल्याचा आरोप त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच केला.

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी अवैध धंद्यांना पाठबळ देवून एक पिढीच बरबाद केल्याचा आरोप गुलाबराव देवकर यांनी केला.

शेतकरी कर्जमाफी, शेतीसाठी 24 तास वीज, कापसाला सात हजार रुपयांचा भाव मिळावा, सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळावी, गिरणा धारण व अंजनी धरणाचे पाणी वराड मुसळी चिंचपूर एकलग्न इत्यादी गावांना मिळावे बांभोरी प्रचा गिरणा पूल धरणाच्या कामाचे विविध उर्वरित काम पुर्ण करावेत, संजय गांधी योजनांचे लाभार्थ्यांना पगार 600 वरून 1500 रुपये करण्यात यावा अशी मागणी केली.

कायदेशीर अडचणीमुळे आपल्यापासून लांब गेलो होतो. मात्र, आता मी येणारच नाही अशी चाट गुलाबराव पाटलांनी मारली आणि निवडणूक जिंकली. पहिल्यांदा पाटील यांचा पराभव केला तेव्हा त्यांनी उड्डाणपुलाचे नुसते भूमीपूजन करून दाखवावे, मी देवकरांचा सानेपटांगणावर जाहीर सत्कार करेल अशी चाट मारली होती.

मी तीन वर्षात उड्डाणपुल पुर्ण करून दाखवला. धरणगावच्या जलशुध्दीकरण केंद्राचे घोंगडे सुध्दा असेच भिजत पडले आहे. राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना हे काम सुध्दा करता आले नाही. धरणगावचा विकास खुंटला असून विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आता आपण पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा गुलाबराव देवकर यांनी याप्रसंगी केली.

विविध मागण्यांचे निवेदन गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने दिले. याप्रसंगी गफ्फार मलिक, वाल्मिक पाटील, सौ.मंगला पाटील, राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष मोहननाना पाटील, रवींद्रदादा पाटील, रमेश माणिक पाटील, माजी नगरसेवक दिपक वाघमारे, अ‍ॅड.वसंतराव भोलाणे, प्रकाश महाजन, माजी आ.हरिभाऊ महाजन, कृउबासचे माजी सभापती रोहिदास पाटील, डॉ.मिलिंद डहाळे, श्रीमती शिला चव्हाण, भुषण माधव पाटील, चेतन पाटील, भुपेंद्र पाटील, सौ.सीमा नेहेते, सौ.कल्पना अहिरे, अमोल हरपे, माजी नगरसेवक निलेश चौधरी, भूषण मराठे, संभाजी कंखरे, अविनाश पवार, अमित शिंदे, दीपक जाधव, एन.डी.पाटीलसर, डी.एस.पाटीलसर, धनराज माळी, विजय पाटील, शिवरत्न पवार, डॉ. नितीन पाटील, चमगावचे रंगराव पाटील, गारखेड्याचे किशोर पाटील, पिंंपळ्याचे संजय पाटील आदींचा समावेश होता. निवासी नायब तहसिलदारांनी निवेदन स्विकारले. जाहिर सभेचे सुत्रसंचलन लक्ष्मण पाटीलसर यांनी केले.

LEAVE A REPLY

*