महापुरुषाच्या प्रतिमा विटंबनेवरुन भूमिअभिलेख कार्यालयात वाद

0
जळगाव  / येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयात महापुरूषाच्या प्रतिमेची विटंबना झाल्याने वाद निर्माण झाला होता.
दरम्यान उपअधीक्षकांच्या लेखी माफीनाम्यानंतर या वादावर पडदा पडला.

जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाच्या कार्यालयात राजा सोनवणे यांनी दिलेली महापुरूषाच्या प्रतिमेची विटंबना झाल्याची तक्रार सोनवणेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिभा शिरसाठ, पराग कोचूरे, जमील शेख, अमजद पठाण, प्रवीण सपकाळे आदींनी करीत उपअधीक्षक चांगदेव मोहोळकर यांना जाब विचारला.

यावेळी अधिकारी व पदाधिकार्‍यांमध्ये वाद झाला. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे एपीआय संदीप आराख, उपनिरीक्षक गिरधर निकम यासह पोलिसांनी येऊन घटनेचा माहिती घेतली.

यावेळी अधीक्षक मोहळकर यांनी लेखी माफीनामा लिहून देत महापुरुषाच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करुन प्रतिमा पुन्हा लावल्याने या वादावर पडदा पडला.

LEAVE A REPLY

*