‘स्मार्ट जळगाव अ‍ॅप’, कॉलसेंटरचे उद्घाटन

0
जळगाव  / जळगावकरांना महानगरपालिकेमार्फत देण्यात येणार्‍या सेवांसाठी महानगरपालिका प्रशासनाने ‘स्मार्ट जळगाव’ ने मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे.
तसेच नागरिकांच्या तक्रारींसाठी कॉलसेंटरही सुरु केले आहे. या दोन्ही सेवांचा आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. आजपासून ‘स्मार्ट जळगाव’ हे मोबाईल अ‍ॅप आणि कॉलसेंटर सुविधा जळगावकरांच्या सेवेत दाखल झाले आहे.

महानगर पालिकेच्या सभागृहात आज या सेवांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललीत कोल्हे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीमती वर्षा खडके, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती कांचन सोनवणे, मनपा आयुक्त जीवन सोनवणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

आपल्या उदघाटनपर भाषणात जिल्हाधिकारी निंबाळकर म्हणाले की, कॉलसेंटरचा दूरध्वनी क्रमांक 790005100 नागरीकांना तात्काळ उपलब्ध झाला पाहिजे. संबंधीतांनी नागरिकांच्या तक्रारांची सोडवणूक तात्काळ करावी असे आवाहन त्यांनी केले. लोकांना चांगली सेवा देणार्‍यांचा सन्मान करण्याबाबतही त्यांनी मनपा प्रशासनास सुचित केले. डिजीटल इंडीया अभियानाअंतर्गत भीम अ‍ॅपच्या डाऊन लोड योजने प्रमाणे स्मार्ट जळगाव पचा ही समावेश करुन विद्यार्थ्यांकडून या पची माहिती नागरीकांना करुन दिली जावी.

आपल्या प्रास्ताविकात आयुक्त जीवन सोनवणे यांनी सांगितले की,90 प्रकारच्या सेवांसदर्भात तक्रारी करता येतील. तक्रार निवारण झाल्यास तसा संदेश तक्रारदार व नियंत्रण अधिकार्‍यांस जाईल.

तक्रारदाराचे समाधान न झाल्यास तक्रारदार ती तक्रार पुन्हा उघडू शकेल. तक्रारदाराचे समाधान झाले नाही असा संदेश संबधी यत्रणेला जाईल.

त्याची कारणमिमांसा होईल सोडवणूक करण्यासाठी वरीष्ठ पातळी वर प्रयत्न केले जातील. नागरीकांना यातून दिलासा मिळेल.

यावेळी महापौर नितीन लढ्ढा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ही प्रणाली विकसीत करणारे अभियंता योगेश बोरोले यांचा जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी महानगरपालिकेतील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचार्‍यांना अहिंसा व दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा दिली.

LEAVE A REPLY

*