राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त निलेश भिल चे भावासह अपहरण !

0
मुक्ताईनगर / तालुक्यातील कोथळी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त निलेश भिल्ल याच्यासह त्याच्या लहान भावाचे अपहरण झाल्याची फिर्याद त्यांच्या आईने मुक्ताईनगर पोलिसात दि १९ रोजी दाखल केली असुन या घटनेने खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार कोथळी येथील सुंदरबाई रेवाराम भिल्ल वय ३०  या यांच्या फिर्यादीनुसार दि १७ रोजी सकाळी पाच वाजेपासुन ते १८ रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत च्या कालावधित फिर्यादीचा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त मुलगा निलेश रेवाराम भिल्ल वय १२ वर्ष व त्याचा लहान भाऊ गणपत रेवाराम भिल्ल वय ७ वर्ष या दोघांना कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची फिर्याद पोलिसात आज रोजी दाखल करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*