पुण्यात अल्पवयीन मुलांची विवस्त्र धिंड, 5 जणांना अटक

0
पुणे / शहरातील एक धक्कादायक बातमी. मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजातून अल्पवयीन मुलांची विवस्त्र धिंड काढण्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगर येथे उघडकीस आला आहे.
पीडित मुलाच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीमुळे वारजे पोलिसांनी चौघांना अटक केलीय.
नवीन खुराणा, यश खुराणा, राजू देवासी आणि प्रदीप साळुंखे या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

खुराणा यांची मुलगी आणि पीडित मुलगा एकाच शाळेत शिकतात.

पीडित मुलगा आपल्या मुलीची छेढ काढत असून तिला त्रास देत असल्याचा खुराणा यांचा समज होता. पीडित मुलगा मित्रांसोबत कर्वेनगर येथील स्विमिंग पुलमध्ये पोहायला गेला होता.

तेथून रात्री 8 वाजता मित्राला सोडायला माळवे आली येथे आला. त्यावेळी आरोपींना तू आमच्या मुलीची छेड काढतो म्हणून बेदम मारहाण केली. त्यानंतर मुलगा आणि त्याच्या मित्राची विवस्त्र धिंड काढली.

LEAVE A REPLY

*