मुक्ताईनगर येथे जुगार अड्यावर धाड

0
मुक्ताईनगर / तालुक्यातील पुरणाड फाट्याजवळील बहुचर्चित हॉटेल रावसाहेब येथे अवैध रित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई  अतिशय गुप्तपद्धतीने करण्यात आल्याने तालुकाभरात खळबळ उडाली.
त्यात तब्बल ३४ जणावर कारवाई करण्यात आली असुन साडेचार लाखांची रोख रक्कम दहा दुचाकी व पाच चारचाकी वाहन ताब्यात घेण्यात आले आहे ही तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई आहे.
याबाबत अप्पर पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनी दिलेल्या माहीतीवरुन , गेल्या अनेक वर्षांपासुन तालुक्यातील पुर्णाड फाटा येथे जुगार अड्डा व दारुचा अड्डा सुरु असल्याची गुप्त माहीती पोलिस प्रशासनास मिळाली त्यावरुन मुक्ताईनगर पोलिस उपविभागीय कार्यालयाचे प्रभारी पदाचा पदभार सांभाळल्यानंतर  अप्पर पोलिस अधिक्षक निलोत्पल  यांनी गेल्या अनेक वर्षापासून बिनदिक्कत पणे चालु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुप्त माहीतीच्या आधारे अतिशय गुप्तपणे धडक कारवाई केली विशेष म्हणजे या कारवाई बाबत मुक्ताईनगर च्या पोलिस प्रशासनास साधा मागमुसही नव्हता आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विशेष पथकाने पुर्णाड फाटा गाठून हॉटेल रावसाहेब येथे सुरु असलेला जुगार अड्ड्यावर धाड टाकली तसेच तेथे अवैध जुगार रोकड व दारुच्या मुद्देमाल ताब्यात घेतला.

त्यात युवराज पाटील व संदिप देशमुख यांचेसह ३२ जणांवर कारवाई करण्यात आली असुन जुगार अड्ड्यावरुन तीन लाख चाळीस हजार रोख रक्कम तसेच एक लाख एकोनावीस हजार रु किमतीची दारु जप्त करण्यात आली .

तसेच दहा दुचाकी वाहने व पाच चारचाकी वाहनानेही ताब्यात घेण्यात आली आहे. याप्रकरणी तीन वेगवेगळ्या गुंह्यांची नोंद करण्यात येणार असल्याची माहीती ही श्री निलोत्पल यांनी दिली.

या कारवाई करणाऱ्या पथकात भुसावळ चे उपनिरिक्षक युवराज अहीरे , ए एस आय दिलिप कोळी , प्रदिप कोळी , तसेच शंकर पाटील, विनोद विटकर , विशाल सपकाळे, संकेत झांबरे , सोपान पाटील, समाधान पाटील, निलेश बाविस्कर , प्रशांत चव्हाण, राहुल चौधरी, नंद्कुमार परदेशी , गुलबक्ष तडवी , विनोद सपकाळे तसेच आर सी पी प्लॅटुन क्र दोन चे कर्मचारी असे एकुन ३२ ते ३४ जनांचा या पथकात समावेश होता.

तसेच पंच म्हणून एस एल नागरे व जे व्ही तायडे होते. सदरची   येवढ्या मोठ्या प्रमाणातील पहीलीच कारवाई असल्याने तालुका भरात याविषयी जोरदार चर्चा सुरु होती.

LEAVE A REPLY

*