स्वाभिमानीने कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

0
सांगली / स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी हे आंदोलन करण्यात आले.
विशेष म्हणजे स्वाभिमानीचे नेते व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे मुख्यमंत्र्यांच्या सोबतच होते.
सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन पार पडले.
यानंतर पुढील कार्यक्रमासाठी रवाना होत असताना कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासन वेळकाढूपणा करत असल्याने कर्ज माफीवरून निषेध करत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत गाडी आडवण्याचा प्रयत्न केला.

तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडाला होता.

यानंतर पोलिसांनी तातडीने स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत बाजूला केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्याच्या या दौर्‍यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतसुद्धा सहभागी होते.

कार्यकर्त्यांनी ज्या वेळी आंदोलन केले त्यावेळी सदाभाऊ खोत हे मुख्यमंत्र्यांसोबत गाडीमध्येच होते.

LEAVE A REPLY

*