कार्यविस्तारकांच्या माध्यमातूनच जळगावचा महापौर – ना.महाजन

0
जळगाव / नाशिक महानगरपालिकेत कार्यकर्त्यांच्या जोरावरच भाजपाने मोठे यश मिळवले. कार्यकर्ता हा भाजपाचा कणा असून त्याने आता विस्तारकाची भूमिका बजावली पाहिजे.
या कार्यविस्तारकाच्या माध्यमातूनच जळगावचा महापौर होईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांनी आज येथे केले.
पंडित दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपाच्या विस्तारक वर्गाचा आज ना.गिरीश महाजन यांच्याहस्ते शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते.

ना.गिरीश महाजन पुढे म्हणाले की, पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्यांच्यासाठी कार्य केले आहे. त्यांच्या योगदानामुळेच पक्षाला आज हे दिवस बघायला मिळत आहे.

त्यामुळे कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना या तळागळापर्यंत पोहचविल्या पाहिजे. सत्तेची मस्ती डोक्यात जावू न देता सर्वसामान्यांसाठी कामे केली पाहिजे.

जळगाव शहरात 43 विस्तारक नेमण्यात आले आहेत. या विस्तारकांच्या माध्यमातूनच मिशन 50 प्लसचे उद्दीष्ट साध्य करुन जळगावचा महापौर होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

 

LEAVE A REPLY

*