अमळनेर पालिका मुख्याधिकारी कार्यमुक्त

0
अमळनेर / येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे यांची प्रशासकीय कारणाने दि. 18 पासून कार्यमुक्त करण्याचे आदेश राज्य शासनाचे नगर विकास विभागाचे अव्वर सचिव जे. एन. पाटील यांनी तातडीने दिले आहेत.
या पदाचा कार्यभार जिल्हा प्रशासन अधिकारी अनिकेत मनोरकर यांच्याकडे सोपविण्याचे आदेशात म्हटले आहे सोनवणे यांची कार्यकाळ अवघ्या 6 महिन्यांसाठी राहिलेला होता, त्यांची कामकाजाची पध्दत पाहाता ते अमळनेरात सेवानिवृत्त होतील, असा अंदाज होता.

आजी-माजी आमदारांच्या राजकिय कूरघोडीतून हा बळी दिला गेल्याची चर्चा असून सत्ताधारी गटातील काहींनी मात्र पेढे वाटून आनंद व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

आज नगर विकास विभाग शासन आदेश क्र एमसीओ 2017/प्र क्र 178/नवी14 नुसार कार्यमुक्त होऊन तसा अनुपालन अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश शासनाचे सह सचिव ज.ना.पाटील यांनी दिले आहेत.

यावरून मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे यांनी तात्काळ पदभार सोडला.

 

LEAVE A REPLY

*