भडगाव येथील मुलाचे अपहरण

0
भडगाव / येथील यशवंत नगर भागातील रहिवाशी मनोज पांडुरंग पाटील (वय 14) या एकुलत्या एक मुलास दि. 13 मे रोजी सकाळी 8 वाजता त्याच्या घराजवळून कुणीतरी पळवून नेल्याचा संशय आहे.
मुलाचे वडील पांडुरंग गिरधर पाटील (वय 47, रा. यशवंत नगर, भडगाव) यांच्या फिर्यादीहून भडगाव पोलिसात भाग 5 गुरनं 55/2017 भादंवी क्र. 363 दि. 17 रोजी मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी कळविले आहे.

पळवून नेलेल्या मुलाला चेहरा गोल, रंगाने निमगोरा, केसांची ठेवण साधी, पाठीमागे मध्यभागी शेंडी, अंगात डार्क रंगाचा चौकटी हाफ शर्ट, कमरेस बरमुडा पॅन्ट, डाव्या खांद्याच्या पाठीमागे जळाल्याची जुनी जखम, शरीराने सडपातळ असे वर्णन असून तो कोठे आढळल्यास भडगाव पोलिस स्थानकाशी (क्र 02596 – 221333) संपर्क साधण्याचे आवाहन मुलाच्या वडीलांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*