रेल्वे-जिल्हा प्रशासन आमने-सामने

0
जळगाव  / रेल्वे स्टेशन परिसरातील वर्दळ कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गोंविदा रिक्षा स्टॉप ते रेल्वे पार्कींग पर्यंतचा रस्ता जोडण्याचे ठरविले असून यासाठी रेल्वे व खान्देश सेंट्रल परीसराला लागुन असलेली पार्कींगची सामाईक भिंत तोडण्याचे ठरविले आहे.
परंतु रेल्वे प्रशासनाने विरोध केला असून या भिंतीच्या विषयावरून रेल्वे आणि जिल्हा प्रशासन आमने- सामने आले आहे.
खान्देश सेंट्रल परीसरलगत रेल्वे स्टेशनच्या पार्कींगकडील भिंत तोडून वाहतुक वळविल्यास रेल्वे स्टेशन परिसरातील गर्दी कमी होणार असल्याने जिल्हा प्रशासनाने ही भिंत पाडण्याची रेल्वे प्रशासनकडे परवानगी मागितली आहे.
रेल्वे प्रशासनाने भिंत तोडू दिल्यास वाहतुकीला पर्यायी रस्ता होवू शकणार आहे. यासंदर्भांत आ. चंदुलाल पटेल व आ. राजुमामा भोळे यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना या पर्यायी रस्त्यासंदर्भात पत्रही दिले आहे.

आठ दिवसात म्हणणे मांडण्याच्या सुचना
रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी तसेच येण्यासाठी एकच रस्ता असल्याने या रस्त्यावरील भार वाढला आहे. त्यामुळे वाहतुकींचा खोळंबा होवून त्यातुन मार्ग काढणे अवघड होते. मंत्र्यांना देखील अडचणीतून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे खान्देश सेंटल मॉलकडील भिंत पाडून 24 मीटरचा नवा रस्ता तयार करण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरविले आहे. या रेल्वे प्रशासनाने विरोध केला असून आजच्या पाहणीनंतर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी रेल्वे विभागाला भिंत पाडण्याबाबत आठ दिवसात म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे. भिंतीचा हा विषय चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रेल्वे प्रशासनाचा भिंत तोडण्यास विरोध
गोंविदा रिक्षा स्टॉप ते रेल्वे पार्कींग पर्यंतचा रस्ता जोडण्यासाठी खान्देश सेंट्रल परीसर व रेल्वेची भिंत पाडण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केला आहे. त्याठिकाणी रेल्वे पार्कींग व्यवस्था असल्याने रेल्वेला मिळणारे उत्पन्न बंद होणार आहे. तसेच अतिरिक्त वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता असल्यान रेल्वे प्रशासनाने भिंत पाडण्यास विरोध केला आहे.

LEAVE A REPLY

*