वाळू व्यवसायिकांचे शस्त्रेही जप्त होणार

0
जळगाव  / जिल्ह्यातील वाळु व्यवसायिक आणि ठेकेदारांकडे शस्त्रे असल्याची माहिती मिळाली असून शस्त्र लवकरच जप्त करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
अवैध वाळु वाहतुकीमुळे जिल्ह्यात अनेक गंभीर घटना घडल्या आहेत.
जिल्हा प्रशासनातर्फे अवैध वाळु वाहतुकदारांवर कठोर कारवाईची मोहिम उघडण्यात आली आहे.
या मोहिमेत नियमितपणे अवैध वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेतली जात असून ठेका रद्द करणे, ठेकेदारास दंड करणे या स्वरुपातील कारवाईचा समावेश आहे.

प्रशासनाच्या या कारवाईच्या विरोधात वाळू वाहतूकदारांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या, दुसर्‍या दिवशी मोर्चा व नंतर वाहतूकदारांनी थेट बंदच पुकारला.

त्यानंतरही रस्त्यांवर वाळूची वाहतूक करणारी वाहने दिसत आहेत. आंदोलनाद्वारे प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याने त्याची गंभीर दखल जिल्हाधिकार्‍यांनी घेतली आहे.

अनेक वाळू व्यावसायिक, ठेकेदार, वाहतूकदारांकडे रिव्हॉल्वरसारखी शस्त्रे असल्याचे निदर्शनास आले आहे.

ती जप्त करुन अशांवर कायदेशीर कारवाई करु, तसेच वाळू व्यावसायिकांना शस्त्रपरवाना दिला असेल तर त्यासंबंधी पुनर्विचार केला जाईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*