विद्यापीठ निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब

0

जयेश शिरसाळे,जळगाव / राज्यशासनाकडून राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये नवीन विद्यापीठ कायदा लागू झाला असून विद्यापीठांमधील विविध प्राधिकरणाच्या नवीन मंडळाच्या निवडणुका यावर्षापासून घेण्यात येणार आहे.

एप्रिल महिन्यापासून नवीन विद्यापीठ कायदा होवून दोन महिने झाले तरी अद्याप निवडणुकीचा कोणताही कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

दरम्यान आठवडयाभरात विविध प्राधिकरणाच्या निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यशासनाकडून राज्यातील सर्व विद्यापीठांना निवडणुकीबाबतच्या सुचना प्राप्त झालेल्या नाही. सुरुवातीला राज्यातील 11 अकृषी विद्यापीठांना प्राधिकरणाच्या निवडणुक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

त्यानंतर विद्यापीठाकडून प्राधिकरणाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. एप्रिल महिन्यापासून नवीन विद्यापीठ कायदा लागू झाला असून सर्व विद्यापीठांना 1 सप्टेंबरपर्यंत विद्यापीठांना नवीन संचालक मंडळ तयार करण्याच्या सुचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेते.

त्यासाठी प्राधिकरणाच्या निवडणुका या तीन महिने आधी विद्यापीठांना घ्यायचा आहे. शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाला स्थानिक पातळीवर निवडणूक कार्यक्रम राबवावा लागणार आहेत.

उमविकडून तयारी पूर्ण
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून निवडणूकांसाठीची तयारी पुर्ण झाली असून निवडणूक कार्यालय तयार करण्यात आले होते. कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लवकरच प्राध्यापक, पदवीधर मतदारसंघाच्या याद्या तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*