पाचपट दंड आकारणीच्या स्थगित ठरावावर सुनावणी

0
जळगाव  / मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2175 गाळ्यांचे थकीत भाडे वसुलीसाठी पाचपट दंड आकारणी करण्याचा ठराव (क्र.40) दि.19 डिसेंबर 2016 रोजी महासभेने केला होता.
परंतु या ठरावाला शासनाने स्थगिती देवून नगरविकास राज्यमंत्र्यांकडे सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दि.23 रोजी नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्याकडे सुनावणी होणार आहे.

मनपा मालकीच्या 29 व्यापारी संकुलांपैकी 18 व्यापारी संकुलातील 2175 गाळ्यांची मुदत मार्च 2012 रोजी संपुष्टात आली.

त्यामुळे महासभेने गाळे पुन्हा कराराने देण्याबाबत वेगवेगळे ठराव केलेले आहेत. तसेच थकीत भाडे वसुलीसाठी रेडीरेकनरनुसार पाचपट दंड आकारणीचा ठराव क्र.40 दि.19 डिसेंबर 2016 रोजी महासभेत मंजूर करण्यात आला.

मात्र या ठरावाला गाळेधारकांनी विरोध करुन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती.

या तक्रारीची दखल घेवून 40 क्रमांकाच्या ठरावाला स्थगिती देवून नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्याकडे सुनावणी होणार असल्याचे आदेश देण्यात आले होते.

LEAVE A REPLY

*