दरोड्याच्या गुन्ह्यातील पाचही संशयित मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात वर्ग

0
जळगाव  / औरंगाबाद जिल्हयातील वैजापूर पोलिसांनी दरोडयाप्रकरणी पाच संशयितांना अटक केल्यानंतर आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, एका दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
सरस्वती नगरातील जीवन सुभाष कोल्हे वय 25 यांच्या घरासमोरून त्यांची पल्सर एमएच 19 बीवय 7779 ही अज्ञात चोरटयांनी लांबविली होती.
दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास नापोकॉ. सचिन मुंडे करीत असून चोरीला गेलेली मोटारसायकल वैजापूर येथील दरोडयाच्या गुन्हात वापरण्यात आली असल्याचे निषप्ण झाले.

वैजापूर पोलिसात वैभव सरोवरे रा. वैजापुर, रोहीत आहिरे रा. नाशिक, संजय वाघ रा. नाशिक, किरण पवार रा. नाशिक, सागर ढवळे रा. नाशिक या पाचही संशयिताविरुध्द दरोडयाचा गुन्हा दाखल असून ते औरंगाबाद कारागृह होते.

एमआयडीसी पोलिसात दाखल असलेल्या मोटारसायकलीच्या गुन्हात या पाचही जाणांना अटक करण्यात आली. आज न्या. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले एका दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. स्वाती निकम यांनी काम पाहीले.

LEAVE A REPLY

*