अपार्टमेंन्टच्या फ्लॅटमधून तीन मोबाईलसह रोकड लंपास

0
जळगाव  / शाहुनगरा परिसरातील अथर्व अपार्टमेंन्टमध्ये भाड्याने राहणार्‍या तरूणांच्या प्लॅटचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी प्लॅटमधून चौघे तरूण झोपलेले असतांनाच तीन महागडे मोबाईल व पाच हजार रुपयांची रक्कम अर्ध्यातासात चोरून नेल्याची घटना सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी तरूणांनी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शाहुनगरातील आश्विनी हॉस्पीटलजवळ अथर्व अपार्टमेंन्ट असून यातील प्लॅट क्रं. 9 मध्ये स्वप्निल दिलीप पंडीत रा.बुर्‍हाणपुर, धिरज शशिकांत झांबरे रा.पाल व गजानन धुगे रा. यवतमाळ हे तिघे तरूण भाड्याने राहतात.
दरम्यान, मित्राच्या लग्नासाठी तसेच कंपनीच्या कामानिमित्त या तिघांचा मित्र मनोज राजाराम वाघ रा. नाशिक हा देखील दि 17 रोजी रात्री नाशिक येथून त्यांच्याकडे आला होता.

रात्री जेवन झाल्यानंतर चौघेही झोपून गेले. धिरज व मनोज याने झोपण्याअगोदर त्यांचे मोबाईल शेजारीच ठेवले होते. तर स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत असल्याने गजानन हा नेहमीप्रमाणे सकाळी युनिक अकॅडमी येथे अभ्यासिकेसाठी प्लॅटचा दरवाजा उडकवून निघून गेला.

यावेळी प्लॅटमध्ये धिरज, मनोज, स्वप्निल हे तिघे झोपलेले होते. सकाळी 7 वाजेच्या सुमारास मोबाईलचा अलार्म वाजल्याने मनोजला जाग आली आणि अलार्म बंद करून मनोज हा पुन्हा झोपून गेला.

मात्र, यानंतर घराचा दरवाजा उघडा असल्याचा व तिघेही गाढ झोपेत असल्याची संधी साधत चोरट्याने घरात प्रवेश केला. यानंतर घरातील तीन महागडे मोबाईल व पाच हजारांची रक्कम तसेच दोन पाकिट चोरट्याने चोरून नेले.

दरम्यान चोरटयांनी धिरज झांबरे याचा साडे तीन हजारांचा सॅमसंग मोबाईल तर 12 हजार रुपये किंमतीचा रेडीमी नोट मोबाईल असे दोन मोबाईलसह पाचशे रूपये व पाकिट चोरून नेले आहे.

तर मनोज वाघ यांचा देखील 18 हजार रुपये किंमतीचा महागडा मोटोजी मोबाईल आणि तीन हजार रुपयांची रोकडे लंपास केली असून स्वप्निल यांच्या पॅन्टच्या खिशातून पाकिट व हजार रुपये चोरून नेले आहे.

जवळपास 50 हजारांचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला असल्याचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

*