मोदींविरोधात आंदोलन करणार यवतमाळमधील शेतकरी

0
मुंबई  / लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी येथील शेतक-यांसोबत ङ्गचाय पे चर्चाफ केली होती. नरेंद्र मोदींनी त्यावेळी शेतक-यांना दिलेल्या आश्वासनांपैकी एकाचीही पूर्ती न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
त्यामुळे यवतमाळमधील शेतकरी आता मोदींविरोधात आंदोलन करणार आहेत.

नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी येथे ङ्गचाय पे चर्चेफत शेतकर्‍यांना दिलेल्या आश्वासनांपैकी एकाचीही पूर्ती झालेली नाही.

18 मे रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर 150 शेतकरी त्याची आठवण करून देण्यासाठी दाखल होणार आहेत. 18 मे रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून हे शेतकरी 24 तासांचे आत्मक्लेश उपोषण करणार आहेत.

शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये होतात. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यक्रमासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी हे गाव निवडले होते.

 

LEAVE A REPLY

*