राज्यातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा सिंधुदुर्गात होणार !

0
सिंधुदुर्ग  / राज्यातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच कार्यन्वित होत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दिली.
येथील विश्रामगृहावर आयोजित बैठकीत या कार्यशाळेच्या उभारणीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

संसर्गजन्य संशोधन प्रयोगशाळेत सूक्ष्मजीव शास्त्र, विषाणू विभाग, रक्तातील पातळ द्रव्याच्या अभ्यासाचा विभाग व रेण्वीय विभाग असे चार विभाग कार्यरत राहणार असल्याचे सांगून डॉ.सावंत म्हाणाले की, एकूण 13 रोगांवरील तपासण्या होणार आहेत.

या प्रयोगशाळेत वीज पुरवठा अखंड उपलब्ध रहावा यासाठी जनरेटर सुविधा तसेच दुसर्‍या मजल्याचे बांधकाम लवकरात-लवकर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

 

LEAVE A REPLY

*