आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालानंतर राज्यभरात आंनद

0
मुंबई  / पाकिस्तानमधील अटकेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निकालानंतर कुलभूषण यांच्या मित्रपरिवारासह संपूर्ण राज्यात आंनद व्यक्त केला जात आहे.
पाकिस्तानने कुलभुषण यांना रॉचा एजंट असल्याचा आरोप करत त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यामुळे राज्यभरात संतापाची भावना होती.
आज हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषणप्रकरणी सुनावणी सुरू झाली. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. श्री निलकंठेश्वर मंदिरात कुलभूषण जाधव यांची सुटका होण्यासाठी यज्ञ करण्यात आला होता.
कुलभूषण यांच्या जीवाला धोका असल्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अंतिम निर्णयापर्यंत फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. तर जाधव सुरक्षीत असल्याची हमी पाकिस्तानने द्यावी असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयातील निकाल कुलभूषण जाधव यांच्या बाजूने लागावा यासाठी मुंबईतील ना. म. जोशी मार्गावर त्यांच्या मित्रपरिवाराकडून गुरुवारी सकाळी गणपतीची पूजा-अर्चा करण्यात आली होती.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल कुलभूषण जाधव यांच्या बाजूने लागल्यामुळे मुंबईमधील ना. म. जोशी मार्ग येथे रहात असलेल्या त्यांच्या मित्र परिवाराने जल्लोष साजरा केल्याचे चित्र गुरुवारी पहायला मिळाले.

या वेळी बोलताना कुलभूषण जाधव यांचे मित्र तुळशीदास पवार म्हणाले, आंतराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाच आम्ही सगळे स्वागत करतो, व्यक्तिश: मला खूप आनंद झाला असून कुलभूषण निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे.

आता कधी एकदा कुलभूषण मुंबईला परततो आणि मी त्याला मिठी मारतो अस मला झाले आहे, असे ते भावूक होऊन म्हणाले.

LEAVE A REPLY

*