पोलीस मुख्यालयासमोरच युवकांकडून शालेय विद्यार्थिनीची छेड

0
कोल्हापूर / पोलीस मुख्यालयासमोरच युवकांकडून शालेय विद्यार्थिनीची छेड काढण्याची घटना घडली आहे.
घाबरलेल्या मुलीने बस थांब्यावरील महिलांना हा प्रकार सांगताच संशयित दोघांना अडवून त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. गर्दी वाढत गेल्याने अखेरीस संशयित दोघांना शाहूपुरी पोलीस घेवून गेले.
पोलीस ठाण्यात हा प्रकार गैरसमजूतीमुळे झाल्याचे स्पष्ट झाल्याने संशयितांना सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस मुख्यालय परिसरातील शाळेत शिकण्यासाठी कसबा बावडा (ता. करवीर) येथील विद्यार्थिनी रोज ये-जा करते. दुपारी ती शाळेतून बाहेर पडली.

न्यायसंकुलाच्या पुढील चौकापर्यंत चालत गेली असता कोल्हापुरातून बावड्याकडे मोटारसायकलवरून निघालेल्या दोघा युवकांनी तिची छेड काढली. ती घाबरल्याने पुन्हा पोलीस मुख्यालयाकडे आली.

ते युवकही तिच्या मागे आल्याने तिने पोलीस मुख्यालयासमोरील बस थांब्यावर थांबलेल्या दोन महिलांना हा प्रकार सांगितला.

महिलांनी दोघा युवकांना थांबवून याबाबत विचारणा केली. दरम्यान, त्या महिलांनी मुलीच्या वडिलांना फोन करून बोलावून घेतले.

तेही घटनास्थळी आले. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. चौकशीसाठी संशयित युवकांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

तेथे हा प्रकार गैरसमजूतीमुळे झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्या युवकांना सोडून देण्यात आले.

LEAVE A REPLY

*