आमदाराला दाखवला दारुचा नैवेद्य;बाटल्या फोडून केले आंदोलन

0
जळगाव / येथील दारू दुकानांचा प्रश्न मिटल्यानंतर आता भुसावळच्या आमदारांनीही जळगावचाच कित्ता गिरवत दारू दुकाने, हॉटेल्स वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
बंद पडलेली दारू दुकाने पुन्हा सुरू करण्यात यावी यासाठी हे आमदार प्रयत्नशील आहेत.
त्यांचा हाच प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भुसावळमधील पीआरपीसह विविध दहा सामाजिक संघटनांनी एशियन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 वर आगळावेगळा पवित्रा घेत बाटली फोडो आंदोलन केले.

यावेळी भाजप आमदार संजय सावकारे यांच्या प्रतिमेला दारुच्या बाटल्यांचा हार घालत त्यांच्या प्रतिमेस दारुचा नैवेद्य दाखविण्यात आला. दारू दुकाने सुरू करण्यासाठी पालकमंत्री यांना पत्र देण्यात आले होते.

तसेच दारुची दुकाने सुरू करण्यासाठी आमदारांकडून अर्थकारण केले जात होते, मात्र हा सगळा प्रकार कोण करत आहे यावर आरोप-प्रत्यारोप घडू लागल्याने शहरातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे.

LEAVE A REPLY

*