शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्यात राजू शेट्टीही सहभागी होणार

0
मुंबई / भाजप विरोधात विरोधक रस्त्यावर उतरलेले असताना शेतकर्‍यांच्या प्रश्नावर शिवसेनाही सत्तेतील लहान पक्षांची जुळवा जुळव करत असल्याचे चित्र दिसत आहे.
शिवसेनेच्या नाशिक येथील कर्ज मुक्ती मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ही सहभागी होणार आहेत. नाशिक येथे 19 मे रोजी हा मेळावा होईल.

आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय झाल्यास शेट्टी यांच्या संघटनेसह राज्यातील इतर लहान पक्षांना एकत्र करुन निवडणूक लढण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही दिवसांपूर्वी त्यांनी मातोश्री येथे ठाकरे यांची भेट घेतली होती.त्यावेळीस शेतकर्‍यांच्या प्रश्नावर एकत्र लढण्याचा निर्णय झाला होता.

LEAVE A REPLY

*