काँग्रेस , राष्ट्रवादीचे दिग्गज भाजपमध्ये जाण्यास इच्छूक

0
सांगली / भाजपने गेल्या काही काळात जिल्ह्यात मोठी मुसंडी मारली आहे. केंद्र आणि राज्यातील सरकारे चांगल्या प्रकारे काम करत आहेत.
त्यामुळे भाजपला मोठी संधी असल्याने पक्षात येण्यासाठी काँग्रेस,राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज इच्छुक आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
टप्प्याटप्प्याने त्यांना प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती भाजपचे ग—ामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दिली.

सांगलीत पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले,भाजपने नगरपालिकांपाठोपाठ जिल्हा परिषदेवरही झेंडा फडकवल्यानंतर जिल्ह्यात भाजपमध्ये येण्यास अनेक दिग्गज इच्छुक आहेत.

भाजप शिस्तबद्ध पक्ष आहे. आमच्या सर्व नेत्यांमध्ये चांगला समन्वय आहे. केंद्र आणि राज्यातील सरकारने जनतेसाठी विविध योजना आणल्या आहेत.

त्यामुळे भाजपची ताकद वाढत असल्याने भाजपमध्ये येण्यास मोठ्या संख्येने नेते इच्छुक आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीवेळीच काही जण येण्यास तयार होते.

जिल्ह्यातील सिंचन योजनांचे वीजबिल थकीत आहे. तरीही योजनांचे पाणी सुरू आहे. योजनांचे बिल भरावे लागेल.

त्यासाठी भाजप शेतकर्‍यांना बिल भरण्यासाठी प्रबोधन करणार आहे. वीज बिलासाठी जनजागृती हे भाजपचे मिशन असणार आहे. पावसाळ्यात हे मिशन सुरू होईल, असे पृथ्वीराज देशमुख म्हणाले.

 

LEAVE A REPLY

*