इंग्रजी पाट्या असलेल्या दुकानांना मनसेने काळे फासले

0
मुंबई / कल्याणमधील मनसेला आता पुन्हा जाग आली असून मराठीचा मुद्दा पुन्हा हाती घेतल्याचे दिसत आहे.
शहरातील इंग—जी पाट्या असणार्‍या दुकानांना मनसेने काळे फासत आपला विरोध व्यक्त केला.
यावेळी झालेल्या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, माजी आमदार प्रकाश भोईर, कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, महिला आघाडीच्या शीतल विखणकर, स्मिता खरे यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कल्याणच्या शिवाजी चौक परिसरात गेल्या काही महिन्यात अनेक नवीन दुकाने सुरू झाली आहेत.

तर अनेक दुकानदारांनी नूतनीकरण केले आहे. मात्र या दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या नावाच्या पाट्या केवळ इंग्रजी मध्ये लावल्या होत्या.इंग्रजी पाट्या असलेल्या दुकानांना मनसेने काळे फासले

नेमका हाच मुद्दा कल्याण शहर मनसेने हाती घेत ज्या दुकानांवर इंग्रजी पाट्या होत्या त्यांना काळे फासत आपला निषेध व्यक्त केला.

येथील शिवाजी चौक ते मोहम्मद अली चौक परिसरात असणार्‍या विविध दुकानांच्या पाट्यांना काळे फासत 2 दिवसाचे अल्टिमेटम दिल्याची माहिती पत्रकारांना देण्यात आली.

यावेळी काही दुकानांवर इंग्रजी बरोबरच मराठी पाट्या असतानाही त्यांना काळे फासल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

*