विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनानिमित्त मंत्रालय रविवारी सुरु राहणार

0
मुंबई / महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयक व तद्नुषंगिक इतर विधेयके मांडून पारित करण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचे द्वितीय अधिवेशन दिनांक 20 ते 22 मे 2017 या कालावधीत होणार आहे.
त्यामुळे रविवार, दिनांक 21 मे 2017 या शासकीय सुट्टीच्या दिवशी मंत्रालयाचे कामकाज सुरु राहणार आहे.

मंत्रालयातील सर्व विभागांनी रविवार, दिनांक 21 मे, 2017 या शासकीय सुट्टीच्या दिवशी विधानमंडळात होणारे कामकाज विचारात घेऊन या कामकाजाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना तसेच त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयातील संबंधितांना उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना देण्यात याव्यात, असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.

LEAVE A REPLY

*