एसबीआयच्या मोबाईल वॉलेट व्यवहारावर 25 रुपये भुर्दंड ?

0
मुंबई /  एसबीआयच्या मोबाईल वॉलेटमधून पैसे काढल्यास 25 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सेव्हिंग बँकमधील पैसे एटीएममधून काढल्यास आकारण्यात येणार्‍या शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं स्पष्टीकरण स्टेट बँक ऑॅफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने दिले आहे.

एक जूनपासून एसबीआयच्या एटीएम व्यवहारावर 25 रुपये अधिकचे शुल्क आकारले जाणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या.

एसबीआयकडून या अफवांचं खंडण करण्यात आले आहे.

सेव्हिंग अकाऊंटशी संबंधित एटीएम व्यवहारावरील सेवा शुल्कात कोणतेही बदल केलेले नाहीत, अशी माहिती एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक (नॅशनल बँकिंग) रजनीश कुमार यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*