पाच कृषी सहायकांना नोटीस बजावण्याचे आदेश

0
जळगाव / शासनाच्या उन्नत शेती समृध्द शेतकरी कार्यक्रमात कर्तव्यात कसुर करणार्‍या पाच कृषी सहायकांना नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज दिले.
उन्नत शेती समृध्द शेतकरी कार्यक्रमासंदर्भात आज कृषी अधिक्षक कार्यालयातर्फे तालुका कृषी अधिकार्‍यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा कृषी अधिक्षक विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी, डॉ. एम.आर.बेडीस, आत्माचे प्रकल्प उपसंचालक सुदाम पाटील, कृषी शास्त्रज्ञ बी.डी.जडे आदी उपस्थित होते.

1400 शेततळे पुर्ण
जिल्हा कृषी विभागाला मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत 2 हजार शेततळ्यांचे उद्दीष्ट ठरवुन देण्यात आले आहे. त्यापैकी 1400 शेततळे पुर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी दिली. पदभार घेण्याआधी जिल्ह्यात केवळ 232 शेततळे झाले होते. मात्र महिनाभरात तब्बल 1400 शेततळे पुर्ण झाले ही मोठी उपलब्धी असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

ढोरासारखे काम करू नका- सोनवणे
प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा कृषी अधिक्षक विवेक सोनवणे यांनी तालुका कृषी अधिकार्‍यांसह कृषी सहायकांना चांगलेच फैलावर घेतले. ढोरासारखे काम करू नका असा दमही सोनवणे यांनी भरला. जिल्ह्यात ज्याठिकाणी नुकसान झाले आहे त्याठिकाणचे पंचनामे गुरूवारपर्यंत सादर करा. तसेच जिल्ह्यात स्वयंचलित हवामान यंत्र बसविण्यासाठी 72 ठिकाणे शोधण्यात आली होती. त्यापैकी 28 ठिकाणे ही स्कायनेट कंपनीने रद्द केली आहेत. त्यामुळे नविन ठिकाणे शोधण्याचे आदेशही सोनवणे यांनी दिले.

LEAVE A REPLY

*