अतिक्रमण कर्मचारी हॉकर्समध्ये जोरदार हाणामारी

0
जळगाव  / शहरातील बळीराम पेठ, सुभाष चौक, शिवाजी रोडवरील हॉकर्सला स्थालांतरीत करण्यास दुपारी 11 वाजेच्या सुमारास सुरुवात झाली.
हॉकर्सचे स्थालांतरण करीत असतांना वाद निर्माण होवून मनपा कर्मचारी व हॉकर्समध्ये हाणामारी झाली.
झालेल्या हाणामारीत मनपा कर्मचार्‍याला मारहाण झाली. तर भाजीपाला विक्री करणारी महिला बेशुद्ध पडल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे.
ख्व्वॉजामिया झोपडपट्टीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात शहरातील बळीराम पेठ, सुभाष चौक, शिवाजी रोड वरील 782 हॉकर्सला जागा निश्चित करण्यात आली होती.

आज सकाळी भाजीपाला व फळविक्रेत्यांनी बाजारपेठेत दुकाने थाटली होती. दरम्यान या हॉकर्सना ख्व्वॉजामिया झोपडपट्टीच्या जागेवर स्थालांतरीत करण्यासाठी अतिक्रमण विभागाची गाडी दुपारी 11 वाजेच्या सुमारास सानेगुरुजी पुतळ्याजवळून येतांना दिसताच हॉकर्स व फळविक्रेत्यांमध्ये पळापळ सुरु झाली.

त्यानंतर अतिक्रमण विभागाचे वाहन घाणेकर चौकात येताच त्यांनी आंबेविक्रेत्याची गाडी जप्त करीत असतांना फळविक्रेते व मनपा कर्मचारी यांमध्ये शाब्दिक चकमक होवून वाद निर्माण झाला होता.

त्यानंतर सुभाष चौकात कारवाई करीत असतांना याठिकाणी मनपाच्या चौबे शाळेजवळ भाजीविक्री करणार्‍या महिला व अतिक्रमण विभागातील महिला कर्मचार्‍यांमध्ये चांगली झटापटी झाली. यामुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

LEAVE A REPLY

*