राज्यमंत्री अर्जुन खोतकर कुटुंबीयांनी शेकडो क्विंटल तूर कशी विकली ?

0
मुंबई / राज्यातला शेतकरी आपली तूर विकण्याकरिता वणवण करताना दिसत आहे, असे असताना मंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांच्या कुटुंबियांची 377 क्विंटल तूर 2 दिवसात कशी काय खरेदी केली जाऊ शकते ? असा प्रश्न विचारत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग—ेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये जवळपास साडेचार लाख टन तुरीचे उत्पादन झाले. त्यातील 1 लाख टनापेक्षा अधिक तूर ही केवळ 800 लोकांनी विकली आहे.
तूर खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग—ेस पक्षाने केल्यानंतर सरकारने नेमलेल्या चौकशी समितीतर्फे जालना जिल्ह्यातील सर्वाधिक तूर विकणार्‍या 800 लोकांची यादी दिली आहे. त्यात खोतकरांचे आणि त्यांच्या कुटुंबियांची नावे आहेत.

खोतकर कुटुंबियांनी 14 फेब—ुवारी रोजी 187 क्विंटल आणि 18 फेब—ुवारी रोजी 190 क्विंटल अशी एकूण 377 क्विंटल तूर 2 दिवसात नाफेडच्या खरेदी केंद्रावर विकली.

या प्रकरणाची चौकशी स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पातळीवर सुरू आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळातील एका विद्यमान मंत्र्यांची एवढ्या कनिष्ठ अधिकार्‍यांकडून निष्पक्ष चौकशी होऊन निष्कर्ष निघेल असे वाटत नाही अशी शंका सावंत यांनी व्यक्त केली.

या अगोदरही कनिष्ठ अधिकार्‍यांकडून चौकशी करून राज्याचे सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांना क्लीन चीट दिली होती.

त्यामुळे अर्जुन खोतकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या तूर खरेदी खरेदी प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी सावंत यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*