शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

0
मुंबई / राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे अचानक सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले असून या भेटीचे कारणे गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
फडणवीस आणि पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीचे नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यावर दोन्ही पक्षांकडून तूर्त मौन बाळगण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आजच जळगाव येथे राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असे विधान केले आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची मुख्यमंत्री भेट निव्वळ योगायोग आहे की अन्य काही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेना सतत सत्तेतून बाहेर पडण्याचे इशारे देत असल्याने भाजप अस्वस्थ आहे. त्यातच राज्यात मध्यावधी निवडणुकांचीही चाचपणी पडद्यामागून सुरू आहे.

LEAVE A REPLY

*