विधानसभेत जीएसटी विधेयक एकमताने मंजूर

0
मुंबई / राज्य विधिमंडळाच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी आज वस्तू आणि सेवाकर विधेयकाला (जीएसटी) विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.
जीएसटीसंदर्भातील तीन विधेयके विधानसभेत मांडण्यात आली होती. विरोधकांनी जीएसटीला पाठिंबा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हे विधेयक मंजूर झाल्याचे जाहीर केले.
जीएसटी मंजुरीसाठी बोलावलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आक्रमक झालेल्या विरोधकांनी राज्य सरकारवर वेगवेगळ्या मुद्यांवरून तोफ डागली.
सरकारने विरोधी पक्षांबरोबरच सत्तेतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्याही शंकांचे निरसन केले. त्यानंतर जीएसटी विधेयक मंजुरीचा मार्ग प्रशस्त झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांचे आभार मानले.

मूल्यवर्धित कराकडून आपण आता वस्तू व सेवाकर प्रणालीकडे जात आहोत. ही एक ऐतिहासिक घटना असून आपण सारे त्याचे सक्षीदार आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष, सदस्य तसेच विरोधी पक्षनेत्यांचे अभिनंदन केले.

देशात बारा-तेरा राज्यांनी आतापर्यंत जीएसटीसाठी त्यांचे कायदे केले आहेत. ते सर्वत्र कायदे अवघ्या तीन-चार तासांंच्या चर्चेने मंजूर झाले.

परंतु जीएसटीवर सलग तीन दिवस समग्र चर्चा करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. याशिवाय महापालिकांची स्वायत्तता कायम ठेवणारा व त्यांना भरपाई देणारा कायदाही आपण केला, हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

LEAVE A REPLY

*