..तर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करणार !

0
नवी दिल्ली / गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वाढलेल्या दहशतवादी कारवायांना लगाम घालण्यासाठी भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करू शकतो असा इशारा पाकला पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी इशारा दिला.
दहशतवाद आणि पाकिस्तानकडून सीमेवर होत असलेल्या गोळीबाराला उत्तर देण्यासाठी सरकार काही निर्णायक पाऊल उचलेल, असे त्यांनी म्हटले.
आम्ही जेव्हा सर्जिकल स्ट्राईक केला, तेव्हा माध्यमांना सांगितले होते का? ऑॅपरेशन झाल्यानंतर त्याचा गौप्यस्फोट आम्ही केला.
काहीतरी आम्ही जरूर निर्णायक करू. पण काय करणार हे मला तुम्हाला सांगता येणार नाही. जे योग्य आहे तेच सुरक्षा दले करतील. तुम्हाला याचे परिणाम दिसतीलच, असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

गुप्तचर संस्थाकडून मिळालेल्या माहितीनुसार 15 दहशतवादी शिबिरे आणि 48 लाँचपॅड पाकिस्तानच्या सीमेवर सक्रिय असून त्याचबरोबर सीमारेषेजवळ 4 ते 5 बॅट कॅम्पही सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एलओसीवर 48 शिबिरे सक्रिय असून सुमारे 350 दहशतवादी सीमेजवळील लाँचपॅडमध्ये असून ते घुसखोरीसाठी सज्ज असल्याचे समजते.

दरम्यान केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी पुंछ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना पाकिस्तानच्या या कृत्याचा सर्जिकल स्ट्राइक करून भारत योग्य उत्तर देईल, असा इशारा दिला होता.

हे आता अति झाले आहे. याकडे दरवेळेप्रमाणे दुर्लक्ष करता येणार नाही. दहशतवाद संपवायचा असेल तर त्याला योग्य उत्तर दिलेच पाहिजे.

यासाठी सर्जिकल स्ट्राइकचीच गरज असून दहशतवादाशी निपटण्यासाठी यापेक्षा चांगला उपाय नाही. दहशतवाद्यांविरोधात सरकार कडक कारवाई करेल, असे त्यांनी म्हटले होते.

LEAVE A REPLY

*