बीड जिल्हा बंदला हिंसक वळण

0
बीड / सोशल मीडियावर ओडीओ क्लीप व्हायरल करत महापुरूषांचा अवमान करणार्‍या विठ्ठल तिडके या आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी आज (सोमवारी) मराठा क्रांती मोर्चासह विविध पक्ष संघटना, शिवप्रेमींच्या वतीने बीड जिल्हा बंदचे आवाहन केले होते.
मात्र, दगडफेक आणि जळपोळीच्या घडणांनी या बंदला हिंसक वळण लागले, शहरातात दहा ठिकाणी दगडफेक झाली.
सोमेश्वर नगर भागातही जमावाने बंद दरम्यान तीन बसवर दगडफेक केली. तर जालनारोडवर चित्रीकरण करणार्‍या शिवाजीनगर ठाण्याचा पोलिस कर्मचारी दगडफेकीत जखमी झाला.

बीड शहरातील सिध्दीविनायक कॉम्पलेक्स भागातून सोमवारी सकाळी नऊ वाजता बंदचे आवाहन करण्यासाठी तरूणांची एक रॅली काढली.

पुढे एका रॅलीच्या चार रॅली होऊन त्या विविध भागात गेल्याने पोलिसांना बंदोबस्ताचा अंदाज आला नाही. रॅलीतील तरूणांनी शहरातील बशीरगंज भागातील आशियाना हॉटेल, ताज बिर्याणी हाऊसवर दगडफेक केली.

त्यानंतर शहरातील आसेफनगर कुलरच्या दुकानासह किराणा दुकान व एका साप्ताहिकाच्या कार्यालयावर दगडफेक केली. मोमीनपूरा भागात दुकाने बंदच्या कारणावरून आंदोलक व स्थानिक लोक समोरासमोर आले.

त्यावेळी दोन्ही बाजुने दगडफेक करण्यात आली. ही दगडफेक सुरू असतांना रॅलीतील तरूण तीन दुचाकी जागेवरच सोडून पसार झाल्याने बीड शहर पोलिसांनी तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

मोमीनपुर्‍यातील तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहुण पोलिसांनी येथे बंदोबस्त वाढवला. तेंव्हा दुसरीकडे नगर नाका परिसरात रॅलीत दगड घेऊन फिरणार्‍या दोन तरूणांना शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस उमेश कस्तुरे यांनी ताब्यात घेतले.

या तरूणांना सोडवण्यासाठी एक जमाव थेट शिवाजीनगर ठाण्यात दुपारी साडेबारा वाजता आला. तेंव्हा जमावाने दोन्ही तरूणांना सोडण्याची मागणी केली.

 

LEAVE A REPLY

*