शहरातील रस्त्यांची कामे न करण्याचे शासनाचे मनपाला आदेश

0
जळगाव  / शासनाच्या अमृत योजनेत जळगाव महापालिकेला समाविष्ट करण्यात आले आहे. या योजनेत असलेली पाणीपुरवठा व भुयारी गटारींची कामे जो पर्यंत पुर्ण होत नाही.
तो पर्यंत नविन रस्त्यांची कामे करु नका असे आदेश राज्य शासनाकडून महापालिकेला देण्यात आले आहे.
यामुळे गेल्या चार वर्षांपासून शहरातील नविन रस्त्यांच्या कामांना स्थिगीती मिळाल्याने नगरसेक व पक्षाचे पदाधिकारी हैराण झाले आहे.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दि. 11 रोजी अमृत योजनतील कामे न करण्याबाबतचे आदेश पारीत केले आहेत.
शासनाचे सहसचिव पां. जो. जाधव यांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढण्यात आले आहेत.
या आदेशात त्यांनी ज्या महापालिका किंवा नगरपालिकांमध्ये अमृत योजनेमधून पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण योजना (भुयारी गटारी) असे प्रकल्प राबविले जाणार असतील.
त्या पालिकांनी नविन रस्त्यांची कामे प्रकल्प पूर्ण झाल्यानतंरच त्यांनी ही कामे करावेत असे आदेशात म्हटले आहे.

रस्त्यांची कामे पुढे ढकला
अमृत योजनेतील पाणीपुरवठा योजनेसाठी शहरात नविन जलवाहीन्या टाकाव्या लागणार आहेत त्यामुळे रस्ते खादेले जाणार आहेत. तसेच भुयारी गटारींच्या कामासाठी देखिल रस्ते खोदावेच लागणार आहे. तसेच रस्त्यांची कामे केल्यास शहरातील रस्ते पुन्हा खोदावे लागतील त्यामुळे रस्त्यांची कामे ही पाणी पुरवठा व भुयारी गटारींचे प्रकल्प पूर्ण झाल्यावरच करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. त्यामुळे रस्त्यांची कामे पुढे ढकलावीत तसेच आताच्या स्थितीत जी कामे सुरु आहेत ती देखिल पुढे ढकलावीत असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांची मुदत संपणार्‍या अश्या पालिकांमध्ये रस्त्यांच्या कामांचा निधीची मुदत संपत असेल तर त्याला मुदतवाढ घ्यावीत अश्या सूचना देखिल आदेशात मनपाला देण्यात आल्यात आहेत.

सद्यस्थितीत रस्त्याची कामे नाहीच
जळगाव महापालिकेला विकासकामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मंजूर झालेल्या या निधीतून जळगाव शहरातील विकास कामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. यापूर्वी महापालिका प्रशासनाने या निधीतून शहरातील रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव तयार केला होता. मात्र, जळगाव शहाराला अमृत मधून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. यात शहरातील सुमारे 650 की.मी. च्या जलवाहीन्या टाकल्या जाणार आहेत. यामुळे रस्ते खोदावे लागणार आहेत. यासाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी यापूर्वीच आयुक्त जीवन सोनवणे यांनी नविन रस्त्यांची कामे न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे मंजूर झालेल्या निधीतून सद्यस्थीतीत रस्त्यांची कामे केली जाणार नाहीत.

LEAVE A REPLY

*