प्रियकराच्या मदतीने सेल्सगर्लनेच लुटले 9 लाखांचे दागिने

0
रत्नागिरी / आपल्या ज्वेलर्स दुकानात तुम्ही सेल्सगर्ल ठेवत आहात का? तर सावधान तुम्ही कामावर ठेवलेली मुलगी विश्वासघात तर करत नाही ना? याची खात्री करा.
आपल्या विश्वासाचा फायदा घेऊन ही सेल्सगर्ल आपल्या दुकानातील माल लंपास करत नाही ना? याची खात्री करा. कारण खेड तालुक्यात अशीच एक चोरीची घटना घडली.
शहरातील दांडेकर ज्वेलर्सच्या दुकानात काम करणार्‍या सेल्सगर्लने प्रियकराच्या मदतीने 9 लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली.

याप्रकरणी सेल्सगर्लसह तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड शहरातील दांडेकर ज्वेलर्समध्ये एक तरुणी गेली काही वर्ष काम करत होती.

दुकानाचे मालक किरण दांडेकर यांचा या मुलीवर पोटच्या मुलीप्रमाणे विश्वास होता. मात्र प्रियकराच्या नादाला लागून या तरुणीची नियत फिरली आणि तिने चक्क सोन्याच्या एक-एक वस्तूवर हात साफ करायला सुरूवात केली.

मार्च ते एप्रिल या एका महिन्याच्या कालावधीत दुकानातून या तरुणीने तब्बल 9 लाखांचे दागिने लंपास केली.

दुकानातील दागिने कमी असल्याचा संशय दुकान मालक किरण दांडेकरांना आला. त्यांचा संशय खरा ठरत दुकानात काम करणारीच तरुणी दुकानातील किंमतीचे दागिने लांबवत असल्याचे उघड झाले.

प्रियकराच्या मदतीने तीने हे सर्व कारनामे केले. याप्रकरणी दांडेकर यांनी खेड पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसांनी या तरुणीकडून 9 लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

*