अमेरिकेचा माजी सैनिक ताब्यात

0
नागपूर / व्हीजाची मुदत संपल्यानंतरही गेल्या दोन वर्षांपासून नागपुरात लपून छपून वास्तव्य करणार्‍या अमेरिकन नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याशूवा मेसियाक लॅबोविथ (वय 35) असे त्याचे नाव आहे. तो अमेरिकन सैन्य दलाचा माजी सैनिक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
तो येथे नेमका कोणत्या उद्देशाने राहत होता, ते स्पष्ट न झाल्यामुळे याशूवा हेरगिरी तर करीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रश्नाने प्रशासनाची झोप उडवून दिली आहे.

याशूवा विदेशी सफरीच्या नावाखाली 2013 मध्ये भारतात आला. 10 जून 2013 ला तो नागपुरात आला. सामाजिक कार्याच्या नावाखाली धमार्चा प्रचार प्रसार करताना याशूवाने काही मिशनरीजच्या माध्यमातून एका हॉटेलमध्ये प्रारंभी मुक्काम केला.

नंतर मात्र त्याने एक भाड्याचे घर बघितले. सामाजिक कार्याच्या नावााखाली सर्वत्र मुक्त संचार आणि मुक्त संवाद करतानाच तो दीपाली नामक तरुणीच्या संपर्कात आला.

त्यानंतर या दोघांनी लग्न केले. पुढे हे दोघे दुसर्‍या ठिकाणी आणि नंतर तेथून बोरगावमधील गोकुल हाऊसिंग सोसायटीतील अल्फाईन मेडॉस (फ्लॅट नं. 302) येथे वास्तव्याला आले.

येथे हे दोघे आणि दीपालीची मैत्रीण परिसरातील नागरिकांच्या ओळखीचे आहे. ते काय कामधंदा करतात, ते कळायला मार्ग नाही.

मात्र, त्यांची लाईफ स्टाईल आलिशान असल्याचे परिसरातील मंडळी सांगतात. त्यांच्याकडे येणारांची खासकरून नव्या महिला-पुरुषांची सारखी वर्दळ असते.

LEAVE A REPLY

*